ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

ऑटो चालक अफसर खान यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

On: May 23, 2026 3:29 PM
Follow Us:
---Advertisement---

⛔ टांगा चौक परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त

✍️यवतमाळ :  अशफाक खान


शहरातील कापसे ले-आऊट परिसरातील रहिवासी तसेच टांगा चौक येथून अनेक वर्षांपासून ऑटो रिक्षा व्यवसाय करणारे अफसर खान इब्राहिम खान (वय ५५) यांचे शनिवार, दि. २३ मे रोजी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता शहरात पसरताच मित्रपरिवार, नातेवाईक तसेच ऑटो चालक संघटनेत हळहळ व्यक्त करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास अफसर खान यांना अचानक छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच त्यांच्या नातेवाईकांनी तत्काळ त्यांना शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर सकाळी आठ वाजताच्या सुमारास त्यांना मृत घोषित केले. या अचानक घडलेल्या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अफसर खान हे गेल्या अनेक वर्षांपासून टांगा चौक येथील स्टँडवरून ऑटो रिक्षा चालवत होते. आपल्या प्रामाणिकपणा, साधेपणा आणि मनमिळाऊ स्वभावामुळे ते शहरात सर्वपरिचित होते. प्रवाशांशी नम्र वागणूक, मित्रांशी जिव्हाळ्याचे संबंध आणि गरजूंच्या मदतीसाठी सदैव तत्पर असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यामुळे त्यांच्या निधनाने ऑटो चालक बांधवांसह विविध स्तरातील नागरिकांनी दुःख व्यक्त केले.

त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सायंकाळी मुस्लिम रितीरिवाजानुसार दफनविधी पार पडला. त्यांची अंतिम यात्रा गुलमोहर सोसायटी सबस्टेशनच्या मागे त्यांचे मोठे भाऊ मजहर खान इब्राहिम खान (री.एस.टी. चालक) यांच्या निवासस्थानावरून सायंकाळी सात वाजताच्या सुमारास निघाली. अंतिम यात्रेत नातेवाईक, मित्रमंडळी, परिसरातील नागरिक तसेच मोठ्या संख्येने ऑटो चालक उपस्थित होते. त्यानंतर रात्री आठ वाजताच्या सुमारास येथील मुस्लिम कब्रस्तानमध्ये त्यांच्यावर दफनविधी करण्यात आला.

अफसर खान यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, पाच भाऊ तसेच मोठा आप्तपरिवार असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे परिसरात शोककळा पसरली असून अनेकांनी प्रत्यक्ष भेट देत कुटुंबीयांचे सांत्वन केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

ज्या नात्यावर गुन्हा दाखल झाला, त्याच नात्याचा विवाहात झाला शेवट

लाचखोर वनपालासह दोघे ACB च्या जाळ्यात; ४ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

रावेर जि.जळगांव ऐतिहासिक दोषसिद्धी बद्दल, यवतमाळचे पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांचा पोलिस महासंचालक,मुंबई यांच्या हस्ते गौरव; चार अल्पवयीनांच्या सामूहिक हत्येप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा प्रकरण

यवतमाळच्या महा वॉकथॉनमध्ये गजानन गंड्रतवार यांचा गौरव; चौथा क्रमांक पटकावत मिळविले ३ हजारांचे पारितोषिक

तीन महिन्यांत एसीबीच्या सलग पाच धडक कारवाया; यवतमाळ जिल्ह्यात लाचखोरांमध्ये खळबळ

₹15 हजारांची लाच मागितली; तडजोडीनंतर ₹10 हजार स्वीकारताना आर्णीतील पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात

Leave a Comment