ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

दोन बैल चोरीच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश; पांढरकवडा पोलिसांची मोठी कारवाई, 6 आरोपी जेरबंद – ₹10.05 लाखांचा मुद्देमाल जप्त

On: July 16, 2026 2:18 PM
Follow Us:
---Advertisement---

✍️पांढरकवडा | अशफाक खान

पांढरकवडा पोलीसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या बैल चोरीच्या गुन्ह्यांचा यशस्वी उलगडा करत सहा आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत गुन्ह्यात वापरण्यात आलेली वाहने, मोबाईल तसेच चोरीस गेलेल्या बैलांच्या किमतीची रोख रक्कम असा एकूण ₹10.05 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चोरीस गेलेले बैल कत्तलीसाठी विकल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

पहिल्या घटनेत, दि. ७ जून २०२६ रोजी अयुबखान यासिनखान मनीयार (रा. सरदार पटेल वॉर्ड, पांढरकवडा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ग्राम मांगुर्डा शेतशिवारातील गोठ्यातून रात्रीच्या सुमारास दोन बैल (किंमत ₹40,000) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. याप्रकरणी पांढरकवडा पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 777/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

दुसऱ्या घटनेत, दि. ९ जुलै २०२६ रोजी स्वप्नील अन्नाजी ठाकरे (रा. बोरगाव कडू, ता. केळापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ग्राम घनमोड शेतशिवारातील गोठ्यातून दोन बैल (किंमत ₹50,000) चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली. याप्रकरणी गुन्हा क्र. 868/2026 नोंदवून तपास सुरू करण्यात आला.

पोलीस निरीक्षक एल. डी. तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने गोपनीय माहिती, तांत्रिक तपास आणि स्थानिक माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. तपासादरम्यान दोन्ही गुन्ह्यांतील आरोपींना अटक करण्यात आली.

🎯 अटक करण्यात आलेले आरोपी

– राकेश देविदास चौधरी (दोन्ही गुन्ह्यांतील आरोपी)

– घृप अतुल ठमके

– सय्यद आकीब सय्यद अकबर

– शाहरुख खान अयुब खान

– अभिषेक विजय मडावी

– अभय उर्फ दुर्लभ जयपाल मिश्रा

– तसेच, चोरीचे बैल कत्तलीसाठी विकत घेतल्याप्रकरणी शफी मुदसशीर (रा. आदिलाबाद) याचाही आरोपी म्हणून समावेश करण्यात आला.

पोलीस कोठडीतील चौकशीत आरोपींनी चोरी केलेले बैल कत्तलीसाठी विकल्याची कबुली दिली. त्यामुळे चोरीस गेलेल्या बैलांच्या ₹40,000 व ₹50,000 अशा एकूण ₹90,000 किमतीची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली.

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल

– चोरीस गेलेल्या बैलांच्या किमतीची रोख रक्कम – ₹90,000

– गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल – ₹45,000

– बैल वाहून नेण्यासाठी वापरलेली दोन चारचाकी वाहने – ₹8,50,000

– गुन्ह्यात वापरलेले ५ मोबाईल फोन – ₹1,10,000

एकूण जप्त मुद्देमाल : ₹10,05,000

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबीन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

कारवाईत पोलीस निरीक्षक एल. डी. तावरे, पोउपनि. नितीन सुशीर, पोहेकॉ. प्रमोद जुनुकर, विलास जाधव, रजनीकांत पाटील, नापोकॉ. सुनील राठोड, सचिन काकडे आणि पोकॉ. राजू मुत्तलवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

या दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास सपोनि. सागर पेंढारकर यांच्या नेतृत्वाखाली पोहेकॉ. सुनील कुंटावार, नापोकॉ. संदीप मडावी, जया रोगे आणि पोकॉ. अविनाश रिंगणे हे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

पेपरफुटीविरोधात पांढरकवड्यात युवा टायगर फोर्सचा एल्गार; शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांसाठी एसडीओ कार्यालयावर भव्य मोर्चा

मोहदा येथे 97 .50 लाखांचा दरोडा; ‘राजेंद्र ज्वेलर्स फोडले, चार मुखवटाधारी चोरटे दुचाकीवरून पसार

ऐतिहासिक पायी वारी पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; युवा टायगर फोर्सच्या जनजागृतीमुळे तालुकाभर भक्तिमय वातावरण, विविध समित्यांची घोषणा

पांढरकवड्यात पोलिसांची मोठी कारवाई : कत्तलीसाठी नेली जाणारी २७ जनावरे मुक्त; ₹२९.८० लाखांचा मुद्देमाल जप्त, चार आरोपींवर गुन्हे

सहा.पोलिस अधिक्षक रॉबिन बन्सल यांच्या पथकाची मोठी कारवाई; कत्तलीसाठी हैदराबादकडे नेली जात असलेली २० गोवंश जनावरे व ५ पिकअप वाहने जप्त, ७ आरोपींवर गुन्हे दाखल

पांढरकवडा पोलिसांकडून चोरीस गेलेली मोटारसायकल हस्तगत; आरोपीला कोरपना जि.चंद्रपूरातून अटक

Leave a Comment