ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

मोहदा–झोटिंगधरा मार्गावर भीषण अपघात; दोन दुचाकींच्या समोरासमोर धडकेत २४ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू, पांढरकवड्यातील दोघे गंभीर जखमी

On: July 25, 2026 11:14 AM
Follow Us:
---Advertisement---

धोकादायक ‘ब्लाइंड स्पॉट’ ठरला जीवघेणा; ग्रामस्थांच्या तत्परतेने जखमींना मिळाला तातडीचा उपचार, रस्त्याच्या सुधारणेची जोरदार मागणी

✍️पांढरकवडा (अशफाक खान):

केळापूर तालुक्यातील मोहदा–झोटिंगधरा मार्गावर शनिवारी (दि. 25 जुलै) सकाळी सुमारे 11.00 वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला. दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने 24 वर्षीय तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर दुसऱ्या दुचाकीवरील पांढरकवडा येथील दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की दोन्ही दुचाकींचा अक्षरशः चक्काचूर झाला.

🎯 नातेवाईकांना भेटण्यासाठी निघालेला तरुण काळाच्या पडद्याआड

मिळालेल्या माहितीनुसार, दीपक संतोष कनाके (वय 24, रा. मेटीखेडा, ता. कळंब) हा आपल्या दुचाकीने (क्र. MH 29 Z 8431)  काही कामानिमित्त मोहदा  येथे येथून   नंतर मोहदा येथून वरूड  ता.राळेगाव येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी निघाला होता.

त्याचवेळी जिंकण सूर्यवंशी आणि करीम शेख, दोघेही पांढरकवडा येथील रहिवासी, हे सराठी परिसरातून बकरी खरेदी करून त्यांच्या दुचाकीने (क्र. MH 29 7026) मोहदाच्या दिशेने येत होते.

हेटी आणि झोटिंगधरा गावादरम्यान दोन्ही वाहने एका धोकादायक वळणाजवळ समोरासमोर आली आणि क्षणार्धात भीषण धडक झाली. धडकेचा जोर एवढा होता की दोन्ही दुचाकींचे मोठे नुकसान झाले. या अपघातात दीपक कनाके यांच्या डोक्याला व छातीला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर जिंकण सूर्यवंशी आणि करीम शेख हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

🎯 रस्त्यावरील ‘ब्लाइंड स्पॉट’ ठरला अपघाताचे मुख्य कारण

प्रत्यक्षदर्शी आणि स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताचे प्रमुख कारण रस्त्याची धोकादायक रचना असल्याचे समोर आले आहे.

अपघाताच्या ठिकाणी दोन्ही बाजूंनी उतार असून मध्यभागी उंच चढ असल्यामुळे समोरून येणारे वाहन शेवटच्या क्षणापर्यंत दिसत नाही. या ‘ब्लाइंड स्पॉट’मुळे दोन्ही दुचाकी चालकांना एकमेकांचा अंदाज न आल्याने समोरासमोर धडक झाली. स्थानिकांच्या मते, या ठिकाणी यापूर्वीही अनेक लहान-मोठे अपघात घडले असून हा भाग कायमच अपघातप्रवण मानला जातो.

🎯 पोलीस पाटील आणि ग्रामस्थांची तत्परता ठरली मोलाची

अपघाताची माहिती मिळताच मोहदा येथील पोलीस पाटील पियुष गबराणी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्थानिक नागरिक योगेश शाहू, मोरेश्वर गायकवाड आणि रोशन वाघरहांडे यांच्या सहकार्याने दोन्ही जखमींना त्वरित रुग्णवाहिकेतून रुंझा येथील शासकीय आरोग्य केंद्रात उपचारासाठी रवाना केले. त्यांच्या या तत्परतेमुळे जखमींना वेळेत वैद्यकीय मदत मिळू शकली.

🎯 पोलिसांची कारवाई सुरू

घटनेची माहिती मिळताच पांढरकवडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार लहुजी तावरे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली. मृत दीपक कनाके यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून, या प्रकरणी पांढरकवडा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास ठाणेदार लहुजी तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

🎯 ग्रामस्थांची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तातडीची मागणी

या अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (PWD) तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या मार्गावरील धोकादायक चढ व ‘ब्लाइंड स्पॉट’मुळे वारंवार अपघात होत असल्याने संबंधित ठिकाणी तातडीने रस्त्याचे रुंदीकरण करावे, चढाची उंची कमी करावी, तसेच ‘अपघातप्रवण क्षेत्र’, ‘हळू चाला’ आणि ‘वेग मर्यादा’ दर्शविणारे इशारा फलक बसवावेत, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास भविष्यात आणखी जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

पाटणबोरीत पत्त्याच्या जुगार अड्ड्यावर पांढरकवडा पोलिसांची धाड; ८ जण ताब्यात, ₹१.१९ लाखांचा मुद्देमाल जप्त

जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाला केळापूर वकील संघाचा जाहीर पाठिंबा; लाठीचार्जच्या निषेधार्थ राष्ट्रपतींना निवेदन

सायखेडा मध्यम प्रकल्प ९४.४०% भरला; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, प्रशासनाचे खबरदारी घेण्याचे आवाहन

दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनाला वणीतून जोरदार पाठिंबा; राष्ट्रपतींना एसडीओंमार्फत निवेदन, सोनम वांगचुक यांच्या ताब्याचा निषेध

साखरा उड्डाणपुलावर भीषण अपघात : रॉंग साईडने वळवलेल्या टाटा 407 ला ट्रकची समोरासमोर धडक; चालकाचा जागीच मृत्यू, मुलगा किरकोळ जखमी

पेपरफुटीविरोधात पांढरकवड्यात युवा टायगर फोर्सचा एल्गार; शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांसाठी एसडीओ कार्यालयावर भव्य मोर्चा

Leave a Comment