ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

पर्युषण पर्वानिमित्त जैन युवा मंचकडून गरजूंना वस्त्रवाटप

On: September 12, 2026 11:56 AM
Follow Us:
---Advertisement---

आत्मसंयमासोबत सेवा, करुणा आणि अपरिग्रहाची भावना केली सार्थ
मीच्छामि दुक्कडम ची भावना आचरणात दिसली पाहिजे, ॲड. सिध्दार्थ लोढा

✍️पांढरकवडा : अशफाक खान

जैन धर्मातील पवित्र पर्युषण पर्वानिमित्त जैन युवा मंच, पांढरकवडा यांच्या वतीने शहरातील गरजू व वंचित कुटुंबांना वस्त्रांचे वाटप करण्यात आले. मंचाच्या युवकांनी गरजूंंपर्यंत प्रत्यक्ष पोहोचून त्यांना वस्त्रे प्रदान केली. पर्युषण पर्वाच्या आध्यात्मिक भावनेला सेवा, करुणा आणि परोपकाराची जोड देत समाजाप्रती संवेदनशीलतेचा संदेश यावेळी देण्यात आला.

पर्युषण पर्व हे जैन धर्मामध्ये आत्मशुद्धी, आत्मचिंतन, संयम, तप, क्षमा आणि त्यागाचे अत्यंत महत्त्वाचे पर्व मानले जाते. तसेच जीवदया, करुणा, मैत्री आणि अपरिग्रह यांसारखी मूल्ये जीवनात आत्मसात करण्याची प्रेरणाही या पर्वातून मिळते. याच भावनेला प्रत्यक्ष कृतीत उतरवत जैन युवा मंचाच्या सदस्यांनी गरजू कुटुंबांमध्ये वस्त्रांचे वाटप केले.

🎯 ‘परस्परोपग्रहो जीवानाम्’ची भावना केली साकार

जैन तत्त्वज्ञानाचा मूलभूत संदेश ‘परस्परोपग्रहो जीवानाम्’, अर्थात सर्व जीव एकमेकांच्या उपकारासाठी आहेत, असा आहे. याच विचाराला केंद्रस्थानी ठेवून जैन युवा मंचाच्या सदस्यांनी समाजातील गरजू घटकांप्रती सहकार्य आणि संवेदनशीलतेची भावना व्यक्त केली.

वस्त्रवाटपाच्या माध्यमातून मंचाने असा संदेश दिला की, सण-उत्सवांची खरी सार्थकता केवळ धार्मिक विधी आणि अनुष्ठानांपुरती मर्यादित नसून समाजातील वंचित व गरजू बांधवांनाही आपल्या आनंदात सहभागी करून घेण्यात आहे. या सेवाकार्यातून युवकांनी अहिंसा, अपरिग्रह, जीवदया आणि परोपकार यांसारख्या जैन मूल्यांना सामाजिक जीवनाशी जोडण्याचा प्रयत्न केला.

🎯 युवकांचा उत्स्फूर्त सहभाग

या उपक्रमात सिद्धार्थ लोढा, हर्ष मुथा, आशीष लोढा, सुमित सुराणा, आनंद लोढा, शुभम बोगावत, षष्टी सुराणा, गौरव मुथा, गुरु चोपडा, सर्वेश सुराणा, भाव्य मुथा, वरुण मुथा आणि वैभव मुथा यांच्यासह जैन युवा मंचाच्या सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

🎯 ‘मिच्छामि दुक्कडम्’ची भावना आचरणात दिसली पाहिजे : सिद्धार्थ लोढा

जैन युवा मंचाच्या वतीने सिद्धार्थ लोढा यांनी सांगितले की, पर्युषण हे आत्मचिंतन आणि आत्मसंयमाचे पर्व आहे. ‘मिच्छामि दुक्कडम्’ची भावना केवळ शब्दांपुरती मर्यादित न राहता ती आपल्या आचरणातून क्षमा, करुणा, सहकार्य आणि परोपकाराच्या रूपाने दिसून आली पाहिजे. गरजूंंची सेवा ही मानवीय आणि जैन मूल्यांची एक छोटीशी अभिव्यक्ती आहे.

ते पुढे म्हणाले की, समाजातील गरजू व्यक्तींसोबत आपला आनंद वाटून घेणे आणि त्यांच्या जीवनात सहकार्याची भावना निर्माण करणे, यामुळे पर्वाची भावना अधिक अर्थपूर्ण आणि सार्थक होते.

🎯 सेवाकार्य सुरू ठेवण्याचा संकल्प

या उपक्रमाच्या माध्यमातून जैन युवा मंचाने समाजात अहिंसा, जीवदया, अपरिग्रह, करुणा आणि परोपकाराचा संदेश दिला. मंचाच्या सदस्यांनी भविष्यातही समाजहित आणि सेवेशी संबंधित उपक्रम सातत्याने राबविण्याचा संकल्प व्यक्त केला.

पर्युषण पर्वाच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या या सेवाभावी उपक्रमाने धार्मिक श्रद्धेसोबतच सामाजिक जबाबदारी आणि मानवतेची भावनाही अधिक दृढ केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment