ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

तेजापूरजवळ गोवंशाची निर्दयी वाहतूक उघड; ८ जनावरांसह ८.६२ लाखांचा मुद्देमाल जप्त

On: September 18, 2026 1:28 PM
Follow Us:
---Advertisement---

बोलेरो पिकअपमध्ये कोंबून नेली जात होती ६ गायी, कालवड व गोरा; चालक वाहन सोडून फरार

✍️झरी : अशफाक खान


मुकुटबन पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अडेगाव ते तेजापूर मार्गावर बोलेरो पिकअप वाहनातून गोवंशीय जनावरांची दाटीवाटीने व अमानुष पद्धतीने वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर मुकुटबन पोलिसांनी कारवाई करत ८ गोवंशीय जनावरांची सुटका केली आहे. या कारवाईत जनावरांसह महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन असा एकूण ८ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई १७ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे करण्यात आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी डायल ११२ वर कर्तव्यावर असताना अडेगाव-तेजापूर परिसरातून TG-08-T-6874 क्रमांकाच्या बोलेरो पिकअप वाहनातून गोवंशीय जनावरांना कोंबून नेले जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. यावेळी स.फौ प्रकाश गोरलेवार, चालक तसेच होमगार्ड यांच्यासह पंचांना सोबत घेण्यात आले.

पोलिस पथक सरकारी वाहन मधून अडेगाव-तेजापूर मार्गाने रवाना झाले. दरम्यान, तेजापूर गावातून राम मंदिर व स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर संशयित बोलेरो पिकअप दिसून आली. वाहनाच्या मागील डाला हिरव्या रंगाच्या नेटने झाकण्यात आलेला होता. पोलिसांनी वाहनाचा पाठलाग करून ते तेजापूर येथील स्मशानभूमीजवळ थांबवले.

पोलिसांनी वाहन थांबवताच चालकाने वाहन जागेवर सोडून पळ काढला. त्यानंतर पंचांच्या उपस्थितीत वाहनाच्या मागील डाल्याची तपासणी केली असता त्यामध्ये एकूण ८ गोवंशीय जनावरे अत्यंत दाटीवाटीने कोंबून भरलेली आढळून आली.

तपासणीदरम्यान जनावरांना आखूड दोऱ्यांनी बांधण्यात आल्याचे आढळले.

जप्त करण्यात आलेल्या गोवंशीय जनावरांमध्ये ६ गायी, १ कालवड आणि १ गोरा यांचा समावेश आहे. त्यांची अंदाजे किंमत ६२ हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

गोवंशाची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेले महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन TG-08-T-6874 हे पोलिसांनी जप्त केले आहे. या वाहनाची अंदाजे किंमत ८ लाख रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. जनावरे आणि वाहन मिळून जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ८ लाख ६२ हजार रुपये इतकी आहे.

कारवाईनंतर सर्व ८ गोवंशीय जनावरांची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करून घेण्यात आली. त्यानंतर जनावरांची योग्य देखभाल व संरक्षण व्हावे यासाठी त्यांना श्री गुरू गणेश गोरक्षण चॅरिटेबल ट्रस्ट, रासा, ता. वणी, जि. यवतमाळ येथे दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम, १९६० मधील कलम ११(१)(घ), (ङ), (झ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी लेखी फिर्याद नोंदवून प्रकरणाचा तपास ठाणेदार सतिश जाधव यांच्या मार्गदर्षणाखाली सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

१२ वर्षांपासून फरार असलेल्या पोस्को प्रकरणातील आरोपीला बिहारमधून अटक; पाटण पोलिसांची धाडसी कारवाई, केळापूर न्यायालयासमोर हजर

मार्की (बु.) येथे ढाबा चालकाची निर्घृण हत्या; दोन आरोपींना काही तासांत अटक

24 तासांत गुन्ह्याचा पर्दाफाश : पाटण पोलिसांची तत्पर कारवाई, मोटरसायकल चोरी प्रकरणातील आरोपी अटकेत

शेजारी वादातून रक्तरंजित खून; धारदार हल्ल्यात एक ठार, पत्नी गंभीर — आरोपी अटकेत

झरी तालुक्यात भीषण दुचाकी अपघातात वणीचे माजी नगरसेवक राजू डफ यांचे निधन; शहरात शोककळा

दुःखद बातमी | झरी-जामणी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उप अभियंता संजय शिंदे यांच्या मातोश्रींचे दुःखद निधन

Leave a Comment