ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

विधिमंडळ अंदाज समितीची आमदार संजय देरकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

On: September 13, 2026 4:22 PM
Follow Us:
---Advertisement---

वणी विधानसभा क्षेत्रातील प्रलंबित विकासकामे व जनसमस्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी

✍️वणी | महेश टिपले


यवतमाळ जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून विधिमंडळ अंदाज समितीचा दौरा सुरू असून, समितीचे सदस्य वणी येथे दाखल झाल्यानंतर आमदार संजय देरकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.

यावेळी आमदार संजय देरकर व त्यांच्या पत्नी किरणताई देरकर यांनी समिती सदस्यांचे उत्स्फूर्त स्वागत करून त्यांचा सत्कार केला.

या भेटीदरम्यान आमदार संजय देरकर यांनी वणी विधानसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित विकासकामे, नागरिकांच्या मूलभूत समस्या तसेच परिसरातील महत्त्वपूर्ण प्रश्न समिती सदस्यांसमोर मांडले. या प्रश्नांकडे शासनस्तरावर गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी समितीकडे केली.

यावेळी विधिमंडळ अंदाज समितीचे सदस्य आमदार अर्जुन खोतकर, आमदार दिलीप बोरसे, आमदार काशीराम पावरा आणि आमदार कृष्णा खोपडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या प्रसंगी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा संघटक गणपत लेडांगे, वणी शहरप्रमुख विनोद ढुमणे, शहर संघटक मनीष बत्रा, नगरसेवक सुधीर थेरे, नगरसेवक अजय ढोबे, नगरसेवक अनिकेत बदखल, नगरसेवक गुलाम रंगरेज, जगन जुनघरे, अभय मुथा, सुमेर खान तसेच महिला तालुकाप्रमुख सुरेखा ढेंगळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

विधिमंडळ अंदाज समितीच्या या दौऱ्यामुळे वणी विधानसभा क्षेत्रातील विविध विकासविषयक प्रश्न शासनाच्या स्तरावर अधिक प्रभावीपणे मांडण्याची महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध झाली असून, प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment