ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

वणीत उद्या ‘ग्रँड मस्ती’ फेम कायनात अरोराची एंट्री; मनसेच्या भव्य गरबा महोत्सवाची जय्यत तयारी

On: October 17, 2026 1:36 PM
Follow Us:
---Advertisement---

⛔ राम शेवाळकर परिसरात १८ ऑक्टोबरला रंगणार दांडियाचा जल्लोष; सेलिब्रिटीच्या उपस्थितीने वणीकरांच्या उत्साहाला उधाण

✍️वणी : महेश टिपले

नवरात्रोत्सवाच्या उत्साहाला आणखी रंगत आणण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य गरबा महोत्सव-२०२६ मध्ये यंदा बॉलिवूड अभिनेत्री कायनात अरोरा विशेष आकर्षण ठरणार आहे. ‘ग्रँड मस्ती’ या चित्रपटामुळे प्रसिद्ध झालेल्या कायनात अरोरा यांची उद्या, रविवार दि. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी वणी शहरात विशेष उपस्थिती राहणार असून, त्यांच्या उपस्थितीमुळे गरबा महोत्सवाची रंगत द्विगुणित होणार आहे.

राम शेवाळकर परिसर, वणी येथे सायंकाळी ठीक ६ वाजता या भव्य सोहळ्याला सुरुवात होणार आहे. दांडियाचा ठेका, आकर्षक संगीत, उत्साहपूर्ण वातावरण आणि सेलिब्रिटीची उपस्थिती असा मनोरंजनाचा अनोखा संगम वणीकरांना यानिमित्ताने अनुभवता येणार आहे.

दरवर्षी नवरात्रीच्या निमित्ताने मनसेच्या वतीने विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. याच परंपरेला पुढे नेत यंदा मनसे आयोजित भव्य गरबा महोत्सव-२०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्याचे पक्षनेते राजू उंबरकर यांच्या नेतृत्वात तसेच वणी विधानसभा क्षेत्राच्या वतीने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.

🎯 कायनात अरोराच्या उपस्थितीची उत्सुकता

बॉलिवूड अभिनेत्री कायनात अरोरा यांच्या उपस्थितीची बातमी समोर येताच वणी शहरात या कार्यक्रमाची चर्चा रंगली आहे. विशेषतः तरुणाईमध्ये कार्यक्रमाबाबत मोठी उत्सुकता असून, माता-भगिनी, युवक-युवती तसेच सर्व वयोगटातील नागरिकांना गरब्याचा आनंद घेता यावा, यासाठी आयोजकांकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे.

गरबा आणि दांडियाच्या पारंपरिक उत्साहासोबतच मनोरंजनाची मेजवानी देणारा हा सोहळा वणीकरांसाठी विशेष ठरणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. रंगीबेरंगी पोशाखात दांडियाचा ठेका धरत नवरात्रीचा उत्सव साजरा करण्यासाठी नागरिक सज्ज झाले आहेत.

🎯 वणीकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे

नवरात्रीच्या उत्सवात वणीकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन गरबा महोत्सवाचा मनमुराद आनंद घ्यावा, असे आवाहन मनसे वणी विधानसभा क्षेत्राच्या वतीने करण्यात आले आहे. विशेषतः कायनात अरोरा यांच्या उपस्थितीमुळे यंदाचा गरबा महोत्सव वणीच्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या यादीत आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे.

🔺स्थळ : राम शेवाळकर परिसर, वणी
🔺दिनांक : रविवार, १८ ऑक्टोबर २०२६
🔺वेळ : सायंकाळी ६ वाजता
🔺विशेष आकर्षण : अभिनेत्री कायनात अरोरा

दांडियाचा ठेका, संगीताची धम्माल आणि सेलिब्रिटीची झलक—वणीकरांसाठी उद्याची नवरात्रीची संध्याकाळ खास ठरणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment