ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

पांढरकवडा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; चोरीच्या दोन दुचाकींसह १ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त

On: October 20, 2026 7:49 AM
Follow Us:
---Advertisement---

⛔ मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा छडा; दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

✍️पांढरकवडा: सफी खान


पांढरकवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी केलेल्या प्रभावी तपासातून दोन चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात यश आले आहे. गोपनीय माहिती आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी दोन आरोपींचा शोध घेत त्यांच्याकडून तब्बल १ लाख १० हजार रुपये किमतीच्या दोन मोटारसायकली जप्त केल्या आहेत.

पांढरकवडा पोलीस ठाण्यात मोटारसायकल चोरीसंदर्भात फिर्यादींनी दिलेल्या तक्रारीवरून अप. क्र. १२७३/२०२६ व १२९५/२०२६, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता (BNS) अन्वये गुन्हे दाखल करून तपास सुरू होता. तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीसह तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात आला.

या तपासात अक्षय मोरेश्वर दरने, वय ३१ वर्षे, रा. घोंसी ता. केळापूर याच्या ताब्यातून गुन्ह्यात चोरीस गेलेली स्प्लेंडर प्लस मोटारसायकल क्रमांक MH 29 BS 0067, अंदाजे ५० हजार रुपये किमतीची, हस्तगत करण्यात आली.

तसेच निकेश पुंजाजी किनाके, वय ३५ वर्षे, रा. गौराई (मांगुर्डा) ता.केळापूर याच्या ताब्यातून होंडा शाईन मोटारसायकल क्रमांक MH 29 AX 6017, अंदाजे ६० हजार रुपये किमतीची, जप्त करण्यात आली. अशा प्रकारे पोलिसांनी दोन्ही कारवायांतून एकूण १ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, पांढरकवडा उपविभागीय पोलीस अधिकारी तथा प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश कुमार गाढे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक एल. डी. तावरे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली.

कारवाईमध्ये पो.उपनि. नितीन सुशीर, स.फौ. प्रमोद जुनूनकर, पो.हवा. विलास जाधव, ना.पो.का. सुनील राठोड, सचिन काकडे तसेच पो.शि. राजू मुत्यलवार यांनी सहभाग घेतला.

पांढरकवडा पोलिसांच्या या कारवाईमुळे दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांची सतर्कता आणि तपासाची कार्यक्षमता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment