⛔ दुचाकी, लॅपटॉप आणि टॅब यांसह आकर्षक पारितोषिकांचे वितरण; राजू उंबरकर व तृप्ती उंबरकर यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव
✍️वणी / महेश टिपले
वणी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘मनसे गरबा महोत्सवा’ची उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली. जिल्ह्यातील गरबाप्रेमी आणि स्पर्धकांनी या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. रंगतदार नृत्याविष्कार, चुरशीची स्पर्धा आणि आकर्षक पारितोषिकांमुळे या महोत्सवाला वणीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
महोत्सवातील अंतिम फेरीत मृण्मयी इंदुरकर हिने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आणि विजेतेपदाचा मान मिळवला. स्वाती भारसागर हिने द्वितीय क्रमांक मिळवून लॅपटॉप, तर नेहा तातेड हिने तृतीय क्रमांक पटकावून टॅब जिंकला. विजेत्यांच्या या यशामुळे महोत्सवाच्या अंतिम फेरीला विशेष रंगत आली.
🎯 वयोगटानुसार विजेत्यांनाही आकर्षक बक्षिसे
स्पर्धेतील विजेत्यांसाठी आयोजकांकडून आकर्षक पारितोषिकांची व्यवस्था करण्यात आली होती. प्रथम क्रमांकासाठी दुचाकी, द्वितीय क्रमांकासाठी लॅपटॉप आणि तृतीय क्रमांकासाठी टॅब यांसह स्मार्टफोन, ओव्हन, विविध मौल्यवान वस्तू आणि रोख रकमेची पारितोषिके ठेवण्यात आली होती. वयोगटानुसार झालेल्या स्पर्धेत १६ ते ३० वर्षे वयोगटातून माही ठाकूर, हरप्रित सिंग, अमृता मुसाले, आशा निखार, अर्पित मोहुरले, खुशेर मोहुरले आणि स्नेह प्रेमकुंवर यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.

🎯 मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण
राजू उंबरकर आणि सौ. तृप्ती उंबरकर यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना आकर्षक पारितोषिके, मानचिन्हे आणि प्रमाणपत्रे प्रदान करून गौरविण्यात आले. या बक्षीस वितरण सोहळ्याला ॲड. कुणाल चोरडिया, डॉ. रोहित चोरडिया, अविनाश भुजबळराव, मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकर, शेतकरी संघटनेचे जिल्हाप्रमुख रमेश पेचे, मारेगावच्या नगरसेविका अंजुम शेख, माजी नगराध्यक्ष प्रियाताई लभाणे, बंडू येसेकर, शुभम भोयर, गोविंदराव थेरे, विलन बोदाडकर, मयूर गेडाम, लक्की सोमकुवर, वैभव पुराणकर, जतिन राऊत, मयूर घाटोळे, इरफान सिद्दिकी, निलेश झाडे, गौरव पुराणकर, योगेश तुराणकर, संदीप ठोंबरे आणि पवन इखारे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मनसेच्या वतीने आयोजित या गरबा महोत्सवामुळे वणी परिसरातील गरबाप्रेमींना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळाले. उत्स्फूर्त सहभाग, चुरशीची स्पर्धा आणि आकर्षक बक्षीस वितरणामुळे महोत्सवाची सांगता उत्साहात झाली.









