ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

कायनात अरोराच्या उपस्थितीत ‘मनसे गरबा उत्सव २०२६’चा जल्लोष!

On: October 19, 2026 12:32 PM
Follow Us:
---Advertisement---

⛔ वणीत हजारो रसिकांची तुफान गर्दी; दांडियाच्या तालावर थिरकले तरुणाईसह आबालवृद्ध

✍️वणी / प्रतिनिधी :

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षनेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून तसेच मनसे वणी विधानसभा क्षेत्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘मनसे गरबा उत्सव २०२६’ वणीकरांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रंगलेल्या या भव्य गरबा महोत्सवाला दरवर्षीप्रमाणे यंदाही गरबाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, महोत्सवाच्या आठव्या दिवशी बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री कायनात अरोरा यांच्या विशेष उपस्थितीने कार्यक्रमाला आणखी ग्लॅमर आणि उत्साहाची किनार लाभली.

शहरातील राम शेवाळकर परिसरातील भव्य मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या गरबा उत्सवात कायनात अरोरा यांची एक झलक पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी मोठी गर्दी केली. अभिनेत्रीच्या आगमनानंतर उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कायनात अरोरा यांनी गरबा मैदानावर उपस्थित राहून स्पर्धकांचा उत्साह वाढवला, तसेच दांडियाच्या तालावर सहभागी होत उपस्थित रसिकांनाही ठेका धरायला भाग पाडले. त्यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण मैदानात जल्लोष, टाळ्यांचा कडकडाट आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

🎯 आकर्षक बक्षिसांची मेजवानी

‘मनसे गरबा उत्सव २०२६’मध्ये सहभागी स्पर्धकांसाठी आयोजकांकडून यंदा वयोगटानुसार विविध आकर्षक बक्षिसांची मेजवानी ठेवण्यात आली आहे. यामध्ये दुचाकी, लॅपटॉप, टॅब, स्मार्टफोन, ओव्हन यांसह विविध मौल्यवान वस्तू तसेच रोख पारितोषिकांचा समावेश आहे. त्यामुळे गरबा खेळण्यासोबतच स्पर्धकांमध्ये बक्षिसे पटकाविण्यासाठीही चुरस निर्माण झाली आहे.

🎯 वणीच्या सांस्कृतिक विश्वात भव्य सोहळ्याची नोंद

राजू उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेला हा गरबा महोत्सव केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता वणीच्या सांस्कृतिक विश्वातील एक भव्य आणि लक्षवेधी सोहळा म्हणून ओळख निर्माण करीत आहे. नृत्य, संगीत, पारंपरिक वेशभूषा आणि तरुणाईचा उत्साह यामुळे संपूर्ण वणी शहरात नवरात्रोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. विशेष म्हणजे, या महोत्सवाची चर्चा वणीसह संपूर्ण विदर्भात रंगली आहे.

🎯 प्रशिक्षकांचेही योगदान

या भव्य गरबा उत्सवासाठी जतिन राऊत सर, सचिन कुळमेथे, संदीप ठोंबरे, योगेश तुराणकर, साई आपलपेलीवर, जय खुराणा, राणी हांडे आणि आसिफ मिर्जा यांनी गरबा व दांडिया प्रशिक्षण देत स्पर्धकांना तयार केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विविध गटांतील स्पर्धकांनी आकर्षक नृत्याविष्कार सादर करत उपस्थितांची दाद मिळवली.

🎯 मनसे पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

या कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मनदीप रोडे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश पेचे, जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट, तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकर यांच्यासह मनसेचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महोत्सवाचे नियोजन आणि आयोजन यशस्वी करण्यासाठी लक्की सोमकुवर, वैभव पुराणकर, मयूर गेडाम, मयूर घाटोळे, इरफान सिद्दिकी, आशिष घनकसार, निलेश झाडे, गौरव पुराणकर, संस्कार तेलतुंबडे, रोहित बुग्गेवार आणि पवन इखारे यांच्यासह मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

कायनात अरोरांच्या उपस्थितीने रंगलेला आठवा दिवस वणीकरांच्या स्मरणात राहणारा ठरला असून, ‘मनसे गरबा उत्सव २०२६’च्या पुढील कार्यक्रमांकडे आता वणीकरांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment