ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

महीला वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात

On: October 28, 2026 4:38 PM
Follow Us:
---Advertisement---

⛔ हिवरी वनपरिक्षेत्र कार्यालयात सापळा

✍️यवतमाळ: अशफाक खान


वन्यप्राण्यांकडून शेतातील पिकांचे झालेल्या नुकसानीची शासनाकडून मिळणारी भरपाई मिळवून देण्यासाठी दोन शेतांच्या नुकसानभरपाईपोटी एक हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारणाऱ्या महिला वनरक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवार, २८ ऑक्टोबर रोजी हिवरी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात करण्यात आली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील तक्रारदार हे ४७ वर्षीय शेतकरी आहेत. त्यांच्या स्वतःच्या तसेच पत्नीच्या नावावर असलेल्या शेतातील पिकांचे वन्यप्राण्यांकडून नुकसान झाले होते. या नुकसानीची शासनाकडून भरपाई मिळावी यासाठी त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय (प्रादेशिक), वन विभाग, हिवरी येथे स्वतःच्या व पत्नीच्या नावाने स्वतंत्रपणे दोन अर्ज दाखल केले होते.

या प्रकरणात वनरक्षक कल्पना रुपसिंग राठोड (वय ३०), वर्ग-३, वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय (प्रादेशिक), वन विभाग, हिवरी, जि. यवतमाळ यांनी तक्रारदाराकडे दोन्ही शेतांच्या पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी प्रत्येकी ५०० रुपये याप्रमाणे एकूण १ हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती.

🎯 पंचासमक्ष पडताळणी; लाचेची मागणी स्पष्ट

तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने २८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.४७ ते १.०८ वाजेदरम्यान हिवरी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात पंचासमक्ष तक्रारीची पडताळणी केली. या पडताळणीदरम्यान वनरक्षक कल्पना राठोड यांनी तक्रारदाराच्या स्वतःच्या व पत्नीच्या शेतातील वन्यप्राण्यांमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची शासन भरपाई मिळवून देण्यासाठी प्रत्येक शेतासाठी ५०० रुपये, असे एकूण १ हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तसेच सदर रक्कम स्वीकारण्याची तयारीही त्यांनी दर्शविल्याचे एसीबीने स्पष्ट केले.

🎯 कार्यालयातच स्वीकारले १ हजार रुपये

त्यानंतर एसीबीने सापळा रचला. दुपारी १.४२ ते १.५४ वाजेदरम्यान तक्रारदाराला पंचासमक्ष लाचेची मागणी केलेली १ हजार रुपयांची रक्कम देण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात पाठविण्यात आले.

यावेळी आरोपी वनरक्षक कल्पना राठोड यांनी कार्यालयातच तक्रारदाराकडून १ हजार रुपयांची लाच स्वीकारली. लाचेची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले. संपूर्ण कारवाईचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले असून, त्यांच्या ताब्यातून लाचेची १ हजार रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे.

🎯 घरझडतीची कारवाई सुरू

या प्रकरणी पोलीस स्टेशन यवतमाळ ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपी वनरक्षकास एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेची प्रक्रिया करण्यात येणार आहे. दरम्यान, आरोपीच्या राहत्या घराची झडती घेण्याची कारवाईही सुरू असल्याची माहिती एसीबीने दिली.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, यवतमाळचे पोलीस निरीक्षक मनोज ओरके यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पर्यवेक्षण अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक अभय आष्टेकर यांनी काम पाहिले.

सापळा पथकात पोलीस निरीक्षक स्वप्नील निराळे, पोलीस हवालदार जयंत ब्राम्हणकर, अब्दुल वसीम, अतुल मत्ते, सुधीर कांबळे, पोलीस शिपाई आकाश सहारे, भागवत पाटील, महिला पोलीस शिपाई मनिषा राजुरकर, सरिता राठोड तसेच चालक पोलीस हवालदार अतुल नागमोते यांचा समावेश होता.

या कारवाईसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक बापू बांगर आणि अपर पोलीस अधीक्षक सुनील किनगे यांचे मार्गदर्शन लाभले.

🎯 लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार करण्याचे आवाहन

दरम्यान, कोणत्याही शासकीय कामासाठी लोकसेवकाकडून लाचेची मागणी करण्यात आल्यास नागरिकांनी घाबरून न जाता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीकडून करण्यात आले आहे. भ्रष्टाचारासंबंधी माहिती किंवा लाच मागणाऱ्या लोकसेवकाविरुद्ध तक्रार असल्यास एसीबीकडे तक्रार करता येते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

यवतमाळ तहसील कार्यालयातील प्रभारी निरिक्षण अधिकारी पुरवठा विभाग एसीबीच्या जाळ्यात; रेशन दुकानाचा परवाना वाचविण्यासाठी 50 हजाराची लाच..

ज्या नात्यावर गुन्हा दाखल झाला, त्याच नात्याचा विवाहात झाला शेवट

लाचखोर वनपालासह दोघे ACB च्या जाळ्यात; ४ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

रावेर जि.जळगांव ऐतिहासिक दोषसिद्धी बद्दल, यवतमाळचे पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांचा पोलिस महासंचालक,मुंबई यांच्या हस्ते गौरव; चार अल्पवयीनांच्या सामूहिक हत्येप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा प्रकरण

यवतमाळच्या महा वॉकथॉनमध्ये गजानन गंड्रतवार यांचा गौरव; चौथा क्रमांक पटकावत मिळविले ३ हजारांचे पारितोषिक

तीन महिन्यांत एसीबीच्या सलग पाच धडक कारवाया; यवतमाळ जिल्ह्यात लाचखोरांमध्ये खळबळ

Leave a Comment