ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

लाचखोर वनपालासह दोघे ACB च्या जाळ्यात; ४ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

On: October 1, 2026 7:59 AM
Follow Us:
---Advertisement---

⛔ महागाव येथील लाकूड वाहतुकीच्या परवानगीसाठी लाचेची मागणी; वनपाल, वनमजूर व संगणक ऑपरेटरविरुद्ध कारवाई

✍️यवतमाळ | अशफाक खान


लाकूड वाहतुकीची परवानगी देण्यासाठी तक्रारदाराकडून ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना वनविभागातील वनपाल, वनमजूर आणि संगणक ऑपरेटरविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाई केली. यवतमाळ ACB पथकाने महागाव येथे ही कारवाई केली असून, या प्रकरणामुळे वनविभागातील लाचखोरीचा प्रकार समोर आला आहे.

ACBने दिलेल्या माहितीनुसार, ६० वर्षीय शेतकऱ्याने २९ सप्टेंबर २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, यवतमाळ येथे तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराच्या वडिलोपार्जित शेतातील घर पडल्यानंतर त्यातून निघालेल्या जुन्या सागवान लाकडाचे नूतनीकरण करून वापर करण्यासाठी ते उमरखेड येथे वाहतूक करायचे होते. यासाठी वनविभागाची परवानगी आवश्यक होती.

तक्रारीनुसार, महागाव येथील वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) कार्यालयातील कम्प्युटर ऑपरेटर विनोद सोंळंके याने लाकूड वाहतुकीची परवानगी मिळवून देण्यासाठी तक्रारदाराकडे शासकीय चलनाव्यतिरिक्त ४ हजार रुपयांची लाच मागितल्याचे समोर आले. तक्रारदाराने लाच देण्यास असमर्थता व्यक्त केली असता, “पैसे दिले नाही तर तुमचे काम होणार नाही,” अशा स्वरूपाची मागणी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

🎯 पंचासमक्ष पडताळणीनंतर सापळा

तक्रार प्राप्त झाल्यानंतर ACB पथकाने २९ आणि ३० सप्टेंबर २०२६ रोजी पंचासमक्ष मागणीची पडताळणी केली. या कारवाईदरम्यान वनपाल आनंद बोरेकर, वनमजूर जयवंता ढगे आणि संगणक ऑपरेटर विनोद सोंळंके यांच्याशी संबंधित लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली.

त्यानंतर ३० सप्टेंबर रोजी ACBने सापळा रचला. तक्रारदाराकडून ४ हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात आली. तसेच लाचेच्या रकमेसह शासकीय चलनाची 700 रुपये रक्कम, अशी एकूण 4 हजार 700 रुपयांची रक्कम जप्त करण्यात आल्याचे ACBच्या प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी आरोपींविरुद्ध महागाव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ मधील कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.

🎯 ACB कडून नागरिकांना आवाहन

या कारवाईच्या पार्श्वभूमीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने शासकीय काम करून देण्यासाठी अथवा कामात अडथळा आणण्याच्या भीतीने कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी तत्काळ ACBशी संपर्क साधावा.

तक्रारदाराच्या तक्रारीवर तातडीने कारवाई करून सापळा रचण्यात आल्याने वनविभागातील लाचखोरीविरोधातील या कारवाईकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. सरकारी कामासाठी नागरिकांकडून अवैध पैशांची मागणी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक सुनील किनगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सापळा व तपास पथकात पोलीस निरीक्षक मनोज ओरके,  यांच्यासह ACBच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

ज्या नात्यावर गुन्हा दाखल झाला, त्याच नात्याचा विवाहात झाला शेवट

रावेर जि.जळगांव ऐतिहासिक दोषसिद्धी बद्दल, यवतमाळचे पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांचा पोलिस महासंचालक,मुंबई यांच्या हस्ते गौरव; चार अल्पवयीनांच्या सामूहिक हत्येप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा प्रकरण

यवतमाळच्या महा वॉकथॉनमध्ये गजानन गंड्रतवार यांचा गौरव; चौथा क्रमांक पटकावत मिळविले ३ हजारांचे पारितोषिक

तीन महिन्यांत एसीबीच्या सलग पाच धडक कारवाया; यवतमाळ जिल्ह्यात लाचखोरांमध्ये खळबळ

₹15 हजारांची लाच मागितली; तडजोडीनंतर ₹10 हजार स्वीकारताना आर्णीतील पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात

धरणे, तलावांच्या ५ किमी परिसरात पर्यटनाला बंदी!

Leave a Comment