ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

‘मुख्याधिकारी यांचा वर्ग’ उपक्रमातून विद्यार्थ्यांशी थेट संवाद; शिक्षण, मूल्ये व प्रशासनाची ओळख

On: December 16, 2025 6:39 AM
Follow Us:
---Advertisement---

✍️ पांढरकवडा : अशफाक खान

नगरपरिषद पांढरकवडा येथील प्रभारी मुख्याधिकारी श्री. शशिकांत बाबर (मशप्रसे) यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘मुख्याधिकारी यांचा वर्ग’ या अभिनव व स्तुत्य उपक्रमाअंतर्गत काल दि. १५ डिसेंबर २०२५ रोजी स्व. इंदिरा गांधी नगरपरिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा, पांढरकवडा येथे विशेष शैक्षणिक सत्राचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात शाळेतील इयत्ता चौथी ते सातवीतील सर्व विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.

या वेळी मुख्याधिकारी शशिकांत बाबर यांनी स्वतः विद्यार्थ्यांचा वर्ग घेतला. विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांनी शिक्षणाचे महत्त्व, शिस्त, स्वच्छता, नागरिक कर्तव्य, आत्मविश्वास, ध्येय निर्धारण तसेच समाजातील जबाबदारी यांसारख्या विविध विषयांवर सोप्या व प्रेरणादायी भाषेत मार्गदर्शन केले. हा वर्ग प्रश्नोत्तराच्या स्वरूपात पार पडल्याने विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. विद्यार्थी हसत-खेळत, आनंदी वातावरणात या सत्रात मनापासून रमले होते.

मुख्याधिकारी बाबर यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना अत्यंत संयमाने व आपुलकीने उत्तरे देत त्यांच्यातील जिज्ञासा आणि विचारशक्तीला चालना दिली. प्रशासन कसे कार्य करते, नगरपरिषद काय असते, नागरिकांचे हक्क व कर्तव्ये कोणती, अशा मूलभूत बाबीही त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या. यामुळे विद्यार्थ्यांना केवळ शालेय शिक्षण नव्हे, तर व्यवहारिक व सामाजिक ज्ञान मिळाल्याचे चित्र दिसून आले.

या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षकवृंद, तसेच नगरपरिषदेचे प्रशासन अधिकारी उपस्थित होते. वर्गानंतर मुख्याधिकारी शशिकांत बाबर यांच्या हस्ते उपस्थित विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद व उत्साह ओसंडून वाहत होता.

‘मुख्याधिकारी यांचा वर्ग’ या उपक्रमामागे शहरातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणे, त्यांचे विचार, अडचणी व अपेक्षा जाणून घेणे, तसेच शालेय प्रशासनाशी संबंधित समस्या समजून घेणे हा दुहेरी व व्यापक उद्देश असल्याचे मुख्याधिकारी बाबर यांनी यावेळी सांगितले. प्रशासन आणि विद्यार्थी यांच्यातील दरी कमी करून, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य गाभा आहे.

एकूणच, हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून, शिक्षण आणि प्रशासन यांचा समन्वय साधणारा एक आदर्श उपक्रम म्हणून ‘मुख्याधिकारी यांचा वर्ग’ पांढरकवडा शहरात कौतुकाचा विषय ठरत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

पांढरकवडा पोलिसांची गांजा विक्रीवर मोठी कारवाई; वणीच्या चिखलगाव  येथील मुख्य पुरवठादारासह, पांढरकवडा येथील तिन आरोपीना अटक

पांढरकवडा येथे काँग्रेसचा भव्य कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न; खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या उपस्थितीत संघटन बळकटीकरणाचा निर्धार

आरोग्य क्षेत्रात यवतमाळ जिल्ह्याची देशपातळीवर झेप; केळापूर तालुक्यातील अर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राला ‘राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन’

पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयाचा दुहेरी सन्मान “महाआरोग्य सन्मान २०२६” व “वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार” प्रदान

विद्यार्थीकेंद्रित अर्थसंकल्पासाठी एसआयओ महाराष्ट्र नॉर्थच्या सर्वसमावेशक शिफारसीआमदार राजू तोडसाम यांची सकारात्मक भूमिका;

पांढरकवडा पोलिसांची मोठी कारवाई : मोटारसायकल चोरी प्रकरणात २ आरोपी अटकेत, ४ दुचाकी जप्त — १.५९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Leave a Comment