ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

सन 2025 मध्ये अवैध गुटख्यावर पोलिसांचा कडक प्रहार: 38 गुन्हे, 55 आरोपी; 1.19 कोटींचा मुद्देमाल जप्त

On: December 30, 2025 6:23 PM
Follow Us:
---Advertisement---

⛔“नवीन वर्ष आनंदात साजरे करा, पण मद्यप्राशन करून वाहन चालवू नका” — पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांचा इशारा

✍️यवतमाळ:  अशफाक खान


यवतमाळ जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेचा सविस्तर वार्षिक आढावा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी ३० डिसेंबर रोजी  यवतमाळ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत मांडला. २०२४ च्या तुलनेत २०२५ मध्ये गुन्हेगारी नियंत्रणात लक्षणीय यश मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रलंबित गुन्ह्यांचे प्रमाण २०२४ मध्ये २३ टक्के होते, ते २०२५ मध्ये थेट ७ टक्क्यांवर आले असून, ही बाब प्रभावी प्रतिबंधक कारवाई, समुदाय पोलिसिंग आणि विशेष मोहिमांचे फलित असल्याचे त्यांनी सांगितले.

🎯 शरिराविरुद्धच्या गुन्ह्यांत ठोस घट

२०२५ मध्ये शरिराविरुद्धच्या गुन्ह्यांत २०२४ च्या तुलनेत १९.६० टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन प्रस्थान’ या विशेष उपक्रमामुळे बलात्कार व विनयभंगासारख्या गंभीर गुन्ह्यांत विशेष घट झाली आहे.

🎯 कम्युनिटी पोलिसिंगमुळे गुन्हेगारांवर आवळले नियंत्रण

कम्युनिटी पोलिसिंग, तडीपार, एमपीडीए, तसेच प्रभावी प्रतिबंधक कारवाईमुळे खुनाचा प्रयत्न व दुखापतीच्या गुन्ह्यांत लक्षणीय घट दिसून आली. मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांतही २०२५ मध्ये ९ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे.

🎯 स्ट्रीट क्राईमवर कडक नियंत्रण

फुट-पॅट्रोलिंग, रात्रगस्त आणि गुन्हेगारांवर लक्ष केंद्रीत कारवाईमुळे जबरी चोरीसारख्या स्ट्रीट क्राईममध्ये ४१ गुन्ह्यांची घट झाली आहे. चोरी व घरफोडीचे प्रकारही कमी झाल्याचे अधोरेखित करण्यात आले.

🎯 सायबर गुन्ह्यांत जनजागृतीचा सकारात्मक परिणाम

सायबर जनजागृती कार्यक्रमांमुळे फसवणुकीचे प्रकार कमी झाले असून, नागरिकांमध्ये डिजिटल सावधगिरी वाढल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.

🔺संघटित गुन्हेगारीवर ‘मोक्का’ आणि नव्या कायद्यांतर्गत कारवाई

🔺मोक्का अंतर्गत ३१ आरोपींवर प्रभावी प्रतिबंधक कारवाई.

🔺भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १११ व ११२ अंतर्गत संघटित गुन्हे करणाऱ्या ४ टोळ्यांतील २५ आरोपींवर कारवाई.

🔺एमपीडीए अंतर्गत २७ प्रस्ताव तयार; मपोका कलम ५५ अंतर्गत २ टोळ्यांतील ५ इसमांवर, तर कलम ५६/५७ अंतर्गत ४१ इसमांवर हद्दपारी — एकूण ४६ इसम जिल्ह्यातून हद्दपार.

🎯 अंमली पदार्थ, शस्त्र व वाळू तस्करीवर मोठ्या कारवाया

🔻अंमली पदार्थ : ३४ गुन्ह्यांत ५२ आरोपींवर कारवाई; गांजा व एमडी — ₹४८,३१,९४२ जप्त.

🔻शस्त्र अधिनियम : अवैध अग्निशस्त्र प्रकरणात २० गुन्हे, २४ आरोपी; २५ अग्निशस्त्रे व ३८४ काडतुसे जप्त. अवैध शस्त्रप्रकरणी १३७ गुन्हे, १४७ इसमांवर कारवाई.

🔻अवैध वाळू : २०५ गुन्हे, २८१ आरोपी; ₹३,१३,८४,३३७ किमतीचा मुद्देमाल जप्त.

🎯 अवैध गुटख्यावर कडक प्रहार

२०२५ मध्ये अवैध गुटखा प्रकरणी ३८ गुन्हे दाखल करून ५५ आरोपींवर कारवाई करण्यात आली. या कारवायांतून ₹१,१९,३२,४९४ किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, गुटखा तस्करीविरोधातील मोहिम अधिक तीव्र केली जाईल, असे पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले.

🎯 हरविलेल्यांचा शोध — ‘ऑपरेशन शोध’ला यश

२०२४ अखेर १०७६ व्यक्ती (महिला व पुरुष) मिळणे बाकी होते. २०२५ मध्ये १९५९ नव्याने हरविलेल्यांसह एकूण ३०३५ प्रकरणांपैकी २३९६ व्यक्तींचा शोध घेण्यात आला. २०२५ अखेर ६३९ व्यक्ती मिळणे बाकी असून, मागील वर्षांच्या तुलनेत शोध मोहिमेला मोठे यश मिळाल्याचे सांगण्यात आले.

🎯 नवीन वर्षासाठी पोलिसांचा स्पष्ट इशारा

नवीन वर्षाचे स्वागत आनंदात करा; मात्र मद्यप्राशन करून वाहन चालवू नका. नियम तोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी दिला. जिल्ह्यात शांतता, सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणा पूर्णतः सज्ज असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

अल्पवयीन मुलाचे कस्टडी प्रकरण नागपूरहून पुसदला वर्ग, बॉम्बे उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

दिग्रस भूमी अभिलेख कार्यालयात लाचखोरीचा भांडाफोड उपअधिक्षक व भूमापक ५ हजारांची लाच घेताना एसीबीच्या सापळ्यात अडकले

रेती तस्करांचा पोलिसांवर प्राणघातक हल्ला महागाव तालुक्यातील वाकोडी (वाडी) येथे थरारक घटना; दोन आरोपी अटकेत, तिघे फरार

पोलीस निरीक्षक लाच घेताना रंगेहात अटक; ACB अमरावतीची धडक कारवाई

बालदिनानिमित्त अनाथ विद्यार्थिनींना मायेची ऊबअजय बोरेले यांच्यातर्फे ‘आम्ही साऱ्या सावित्रीच्या लेकी’ अनाथाश्रमात स्वेटर-जर्किन वाटपहॉल बांधकामाला देखील सुरुवात

Leave a Comment