ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

दुःखद बातमी | झरी-जामणी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उप अभियंता संजय शिंदे यांच्या मातोश्रींचे दुःखद निधन

On: February 2, 2026 8:28 AM
Follow Us:
---Advertisement---


✍️झरी: अशफाक खान

झरी (जामणी) येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागात कार्यरत असलेले उप अभियंता श्री. संजय उत्तम शिंदे यांच्या मातोश्रींचे दुःखद निधन झाले आहे.
सौ. निर्मला उत्तमराव शिंदे (वय ७९ वर्षे) यांचे दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ८.३५ वाजता, अल्पशा आजाराने निधन झाले.

स्वर्गीय निर्मला शिंदे या धार्मिक, शांत व कुटुंबवत्सल स्वभावाच्या होत्या. परिसरात त्या प्रेमळ व आदरयुक्त व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांच्या निधनाने शिंदे कुटुंबावर तसेच आप्तेष्टांवर मोठा शोककळा पसरली आहे.

त्यांच्या पार्थिवावर शेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात दोन मुले, नातवंडे व मोठा आप्त परिवार आहे.
या दुःखद घटनेची माहिती समजताच जिल्हा परिषद बांधकाम विभागातील अधिकारी-कर्मचारी, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर, तसेच मित्रपरिवाराने शिंदे कुटुंबीयांची भेट घेऊन शोकसंवेदना व्यक्त केल्या.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व शिंदे कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो, अशी सर्वत्र भावना व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

अंमली पदार्थांच्या विळख्यातून तरुणाईला वाचवण्यासाठी पाटण पोलिसांचे पाऊल; नागरिकांनी माहिती देण्याचे आवाहन

तेजापूरजवळ गोवंशाची निर्दयी वाहतूक उघड; ८ जनावरांसह ८.६२ लाखांचा मुद्देमाल जप्त

१२ वर्षांपासून फरार असलेल्या पोस्को प्रकरणातील आरोपीला बिहारमधून अटक; पाटण पोलिसांची धाडसी कारवाई, केळापूर न्यायालयासमोर हजर

मार्की (बु.) येथे ढाबा चालकाची निर्घृण हत्या; दोन आरोपींना काही तासांत अटक

24 तासांत गुन्ह्याचा पर्दाफाश : पाटण पोलिसांची तत्पर कारवाई, मोटरसायकल चोरी प्रकरणातील आरोपी अटकेत

शेजारी वादातून रक्तरंजित खून; धारदार हल्ल्यात एक ठार, पत्नी गंभीर — आरोपी अटकेत

Leave a Comment