ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

अंमली पदार्थांच्या विळख्यातून तरुणाईला वाचवण्यासाठी पाटण पोलिसांचे पाऊल; नागरिकांनी माहिती देण्याचे आवाहन

On: October 10, 2026 10:13 AM
Follow Us:
---Advertisement---

✍️झरी: अशफाक खान


अंमली पदार्थांचा अवैध व्यापार, विक्री, साठवणूक, वाहतूक आणि सेवनामुळे समाजासमोर गंभीर आव्हान निर्माण झाले असून, विशेषतः तरुण पिढीच्या आरोग्यावर आणि भवितव्यावर त्याचे घातक परिणाम होत आहेत. या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी यवतमाळ जिल्हा पोलिसांकडून अंमली पदार्थांविरोधात प्रभावी मोहीम राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पाटण पोलिसांनी परिसरातील नागरिकांना पुढे येऊन अंमली पदार्थांच्या गैरव्यवहाराची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन ठाणेदार मिलिंद सरकटे यांनी केले आहे.

पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांविरोधात पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. गांजा, चरस, मेफेड्रोन (MD), हेरॉईन, कोकेन तसेच इतर अंमली पदार्थांची विक्री, साठवणूक, वाहतूक अथवा वितरण करणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांची करडी नजर असून, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे ठरणार आहे.

पाटण पोलीस ठाण्याच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, आपल्या परिसरात कोणत्याही व्यक्तीकडून अंमली पदार्थांची विक्री, साठवणूक, वाहतूक किंवा वितरण होत असल्याची माहिती असल्यास ती तात्काळ पोलिसांना द्यावी. माहिती देताना संबंधित व्यक्तीचे नाव, ठिकाण, वाहन क्रमांक, अंमली पदार्थांची विक्री किंवा वाहतूक होण्याची वेळ व ठिकाण यासह उपलब्ध असलेली अन्य माहिती पोलिसांना कळवावी.

अंमली पदार्थांचा विळखा केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित राहत नसून, त्याचे परिणाम कुटुंब, समाज आणि विशेषतः युवकांच्या भवितव्यावर होत असतात. त्यामुळे परिसरात अशा प्रकारची कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास नागरिकांनी दुर्लक्ष न करता पोलिसांना माहिती देणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

माहिती देणाऱ्या नागरिकांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, असेही पाटण पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे कोणतीही भीती किंवा संकोच न बाळगता नागरिकांनी पुढे येऊन अंमली पदार्थांविरोधातील या मोहिमेत पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. समाजातील युवकांना व्यसनाच्या विळख्यापासून दूर ठेवण्यासाठी नागरिक आणि पोलिसांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे पोलिसांनी नमूद केले.

संपर्क
1.मिलिंद सरकटे स. पो.नी पो. स्टे. पाटण मो.9767165871

  1. नागोराव जाधव पो.उ.नि पो.स्टे. पाटण 8007580146

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment