ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

मार्की (बु.) येथे ढाबा चालकाची निर्घृण हत्या; दोन आरोपींना काही तासांत अटक

On: June 10, 2026 2:45 PM
Follow Us:
---Advertisement---

मुकुटबन पोलिसांची जलद कारवाई; जुन्या वादातून खून झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष

✍️झरी :  अशफाक खान


तालुक्यातील मार्की (बु.) येथे ढाबा चालक युवकाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून मुकुटबन पोलिसांनी अवघ्या काही तासांत तपासाची चक्रे फिरवत दोन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103(1) व 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृतकाची ओळख गजानन उर्फ आझाद मोरेश्वर उदकवार (वय 32, रा. मार्की बु. ता. झरी) अशी झाली आहे. गजानन यांनी सुमारे महिनाभरापूर्वी मार्की–मुकुटबन मार्गावर टिनशेडचा ढाबा सुरू केला होता. ढाबा सुरू झाल्यापासून गावातील सचिन सुधाकर टोंगे आणि साहिल राजेश काकडे यांच्याशी त्यांचे वाद सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींनी ढाबा सुरू करू देणार नसल्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

🎯 जेवण बनवून देण्याच्या कारणावरून वाद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 जून रोजी ढाब्यावरील आचारी सुट्टीवर असल्याने गजानन हे एकटेच ढाबा सांभाळत होते. रात्री सुमारे 10 वाजताच्या सुमारास सचिन टोंगे आणि साहिल काकडे हे ढाब्यावर आले. जेवण बनवून देण्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला आणि आरोपींनी गजानन यांना मारहाण केली.

घटनेची माहिती गजानन यांनी फोनद्वारे वडील मोरेश्वर उदकवार यांना दिली. त्यानंतर मोरेश्वर उदकवार आणि धाकटा मुलगा गणेश उदकवार हे तातडीने ढाब्यावर पोहोचले. त्यांनी दोन्ही आरोपींना समज देत वाद मिटवला. त्यानंतर आरोपी तेथून निघून गेले.

🎯 मध्यरात्री पुन्हा परतून केला जीवघेणा हल्ला

प्राथमिक तपासानुसार, झालेल्या वादाचा राग मनात धरून आरोपी मध्यरात्रीनंतर पुन्हा ढाब्यावर आले. त्यावेळी गजानन हे झोपेत होते. आरोपींनी लाकडी दांड्याने त्यांच्या डोक्यावर, कपाळावर आणि तोंडावर जोरदार वार केले. या हल्ल्यात गंभीर दुखापत झाल्याने गजानन यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

🎯 आईला सकाळी आढळला मुलाचा मृतदेह

बुधवारी सकाळी गजानन यांची आई मायाबाई उदकवार या चहा घेऊन ढाब्यावर गेल्या असता त्यांना मुलगा रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत पडलेला दिसला. त्यांनी तत्काळ कुटुंबीयांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्त साचलेले होते. तसेच हल्ल्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय असलेला रक्ताने माखलेला लाकडी दांडा पोलिसांनी जप्त केला.

🎯 तक्रारीनंतर तात्काळ गुन्हा दाखल

मृतकाचे वडील मोरेश्वर उदकवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुकुटबन पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढत सचिन सुधाकर टोंगे आणि साहिल राजेश काकडे यांना काही तासांत अटक केली.

🎯 पोलिसांच्या तत्पर तपासामुळे आरोपी जेरबंद

या गंभीर गुन्ह्याचा वेगाने छडा लावण्यात मुकुटबन पोलीस ठाण्याचे ठाणेदार सतीश जाधव, तसेच बिट जमादार दिलीप जाधव आणि दीपक ताठे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी जलद तपास करत आरोपींना जेरबंद केले.

🎯 परिसरात हळहळ; पुढील तपास सुरू

या घटनेमुळे मार्की परिसरात भीती व हळहळ व्यक्त होत आहे. एका किरकोळ वादाचे पर्यवसान थेट खुनात झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असून पुढील तपास मुकुटबन पोलीस करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

१२ वर्षांपासून फरार असलेल्या पोस्को प्रकरणातील आरोपीला बिहारमधून अटक; पाटण पोलिसांची धाडसी कारवाई, केळापूर न्यायालयासमोर हजर

सगणापूरमध्ये भीषण आग; शॉर्टसर्किटचा संशय, गरीब शेतमजुराचे घर व संपूर्ण संसार जळून खाक

पाटणबोरीत वरली मटका अड्ड्यावर पोलिसांचा धडक छापा; दोन स्वतंत्र कारवायांत पाच आरोपींवर गुन्हे, ५२ हजारांहून अधिक मुद्देमाल जप्त

पाटणबोरीत पुन्हा अवैध मटक्याचा धुमाकूळ; कायमस्वरूपी बंदची मागणी, कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा

सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार संजीव भांबोरे यांची तृतीयपंथी हक्क संरक्षण व कल्याणासाठी जिल्हास्तरीय अशासकीय तक्रार निवारण समितीवर नियुक्ती

खैरगाव (दे.) येथे बनावट व मुदतबाह्य कीटकनाशकांचा मोठा पर्दाफाश; ₹17.82 लाखांचा अवैध साठा जप्त, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Comment