ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

दत्त शिखर संस्थान माहूरगडचे ३० वे महंत १००८ श्री मधुसूदन भारती महाराज यांचे निधन; भाविकांमध्ये शोककळा

On: April 4, 2026 5:35 PM
Follow Us:
---Advertisement---


✍️ पांढरकवडा   :  प्रतिनीधी


लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री दत्तात्रय संस्थान माहूरगड येथील ३०वे महंत, १००८ श्री. मधुसूदन भारती गुरु अच्युत भारती महाराज यांना शनिवारी (दि. ४ एप्रिल) सायंकाळी सुमारे ५ वाजून ५ मिनिटांनी देवाज्ञा झाली. वयाच्या ९२ व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांचे दुःखद निधन झाले असून, या घटनेमुळे संपूर्ण माहूरगड परिसरासह राज्यभरातील भाविकांमध्ये शोककळा पसरली आहे.
भगवान दत्तात्रय यांचे जन्मस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवित्र दत्त शिखर माहूर येथे त्यांनी तब्बल चार दशकांहून अधिक काळ महंत म्हणून कार्य करत संस्थानचा कारभार अत्यंत निष्ठेने आणि समर्पणाने सांभाळला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थानच्या धार्मिक, सामाजिक आणि विकासात्मक कार्याला नवे बळ मिळाले.

मधुसूदन भारती महाराज हे दिनांक १४ मार्च १९७८ रोजी रथसप्तमीच्या शुभ मुहूर्तावर महंतपदी विराजमान झाले होते. त्या दिवसापासून त्यांनी आपल्या साधेपणाने, संयमाने आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून भाविकांचे मार्गदर्शन केले. त्यांच्या कार्यकाळात मंदिर परिसराचा विकास, भाविकांसाठी सोयीसुविधा, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन आणि परंपरेचे जतन यावर विशेष भर देण्यात आला.

त्यांच्या निधनामुळे केवळ एक महंतच नव्हे, तर एक आध्यात्मिक मार्गदर्शक, समाजसेवक आणि प्रेरणास्थान हरपल्याची भावना भक्तगणांतून व्यक्त होत आहे. अनेक वर्षे त्यांनी हजारो भाविकांना अध्यात्माची दिशा दिली आणि श्री दत्तभक्तीची परंपरा अधिक बळकट केली.

महाराजांच्या पार्थिवावर रविवार (दि. ५ एप्रिल) रोजी दुपारी सुमारे ३ वाजता संस्थानच्या परंपरेनुसार श्री दत्त मंदिर माहूर परिसरात समाधी देण्यात येणार आहे. या वेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची शक्यता असून, संस्थान प्रशासनाकडून सर्व आवश्यक व्यवस्था करण्यात येत आहे.
दरम्यान, त्यांच्या निधनाबद्दल विविध धार्मिक संस्था, संत-महंत, सामाजिक कार्यकर्ते तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनीही शोक व्यक्त केला आहे. भाविकांनी “दत्त महाराजांच्या सेवेत आयुष्य व्यतीत करणाऱ्या या महान संताला भावपूर्ण श्रद्धांजली” अर्पण केली आहे.

मधुसूदन भारती महाराज यांच्या रूपाने माहूरगडने एक महान संत गमावला असला, तरी त्यांनी घालून दिलेली अध्यात्माची वाट आणि सेवा-समर्पणाची परंपरा भाविकांच्या मनात सदैव जिवंत राहील, अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

पांढरकवडा पोलिसांची कारवाई : कत्तलीसाठी तेलंगणात नेण्याच्या तयारीतील 12 गोवंशांची सुटका, 8.80 लाखांचा मुद्देमाल जप्त

महावितरणच्या निष्काळजीपणाचा बळी; विजेचा धक्का लागून ३ दुभत्या गायींचा जागीच मृत्यू

मोमीन वेलफेअर फाऊंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; मुंतजीम खान इझहार खानचा जाहीर सत्कार

पांढरकवड्याचे नगराध्यक्ष आतिश उर्फ सोनूभैया बोरेले यांची महाराष्ट्र राज्य नगराध्यक्ष महासंघाच्या अमरावती विभाग उपाध्यक्षपदी निवड

ताडउमरीत तलवारींसह दोन गट आमनेसामने; पांढरकवडा पोलिसांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

मोमिन वेलफेयर फाउंडेशन द्वारा मेधावी विद्यार्थियों का सम्मान समारोह

Leave a Comment