ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार संजीव भांबोरे यांची तृतीयपंथी हक्क संरक्षण व कल्याणासाठी जिल्हास्तरीय अशासकीय तक्रार निवारण समितीवर नियुक्ती

On: July 1, 2026 3:06 PM
Follow Us:
---Advertisement---

✍️चंद्रपूर : प्रतिनीधी

सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार संजीव मुरारी भांबोरे यांच्या सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने त्यांची भंडारा जिल्हास्तरीय तृतीयपंथी तक्रार निवारण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे.

सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, भंडारा यांच्या प्रस्तावानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष सावन कुमार (भा.प्र.से.) यांनी लेखी आदेशाद्वारे ही नियुक्ती जाहीर केली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयानुसार राज्यातील तृतीयपंथी व्यक्तींच्या हक्कांचे संरक्षण, सामाजिक न्याय, सन्मान, कल्याण आणि त्यांच्या विविध तक्रारींचे प्रभावी निवारण करण्याच्या उद्देशाने राज्य, विभागीय आणि जिल्हास्तरावर तक्रार निवारण समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. त्याच अनुषंगाने भंडारा जिल्हास्तरीय समितीवर संजीव भांबोरे यांची अशासकीय सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

नियुक्ती आदेशानुसार त्यांचा कार्यकाळ पुढील आदेशापर्यंत लागू राहणार असून, या आदेशाची प्रत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव, मंत्रालय, मुंबई तसेच आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनाही पाठविण्यात आली आहे.

संजीव भांबोरे हे सामाजिक प्रश्नांवर सातत्याने कार्यरत असून विविध जनहिताच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत. त्यांच्या सामाजिक बांधिलकीची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आल्याने सामाजिक, पत्रकारिता व विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

सगणापूरमध्ये भीषण आग; शॉर्टसर्किटचा संशय, गरीब शेतमजुराचे घर व संपूर्ण संसार जळून खाक

पाटणबोरीत वरली मटका अड्ड्यावर पोलिसांचा धडक छापा; दोन स्वतंत्र कारवायांत पाच आरोपींवर गुन्हे, ५२ हजारांहून अधिक मुद्देमाल जप्त

पाटणबोरीत पुन्हा अवैध मटक्याचा धुमाकूळ; कायमस्वरूपी बंदची मागणी, कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा

खैरगाव (दे.) येथे बनावट व मुदतबाह्य कीटकनाशकांचा मोठा पर्दाफाश; ₹17.82 लाखांचा अवैध साठा जप्त, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

मोहदा येथे भरदिवसा धाडसी घरफोडी; कुलूप तोडून सोन्याचे दागिने व ५० हजारांची रोकड लंपास, फॉरेन्सिक पथकाकडून तपास सुरू

बँकेतून मोठी रोकड काढणाऱ्या ग्राहकांनो सावधान!

Leave a Comment