ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

ऐतिहासिक पायी वारी पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; युवा टायगर फोर्सच्या जनजागृतीमुळे तालुकाभर भक्तिमय वातावरण, विविध समित्यांची घोषणा

On: July 15, 2026 6:55 AM
Follow Us:
---Advertisement---

✍️पांढरकवडा:  अशफाक खान


केळापूर तालुक्यातील धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेला नवी उंची देणाऱ्या ऐतिहासिक पायी वारी पालखी सोहळा २०२६ च्या तयारीला आता वेग आला आहे. शनिवार, दि. २५ जुलै २०२६ रोजी महादेव घाट, पांढरकवडा ते श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, केळापूर या मार्गावर होणाऱ्या भव्य पालखी सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजित नियोजन बैठकीत विविध समित्यांची घोषणा करण्यात आली. नियोजन समितीचे प्रमुख मदन जिद्देवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत संपूर्ण सोहळ्याचे सविस्तर नियोजन निश्चित करण्यात आले असून सर्व समित्यांनी प्रत्यक्ष कामालाही सुरुवात केली आहे.

बैठकीत मुख्य नियोजन, समन्वय, आर्थिक व्यवस्थापन, प्रचार व प्रसिद्धी, वारकरी सेवा, महाप्रसाद व्यवस्था, वैद्यकीय सेवा, वाहतूक व शिस्त, स्वच्छता, पालखी मार्ग नियोजन, वृक्षारोपण, ट्रॅक्टर सजावट तसेच इतर आवश्यक समित्यांची स्थापना करण्यात आली. प्रत्येक समितीला स्वतंत्र जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या असून सोहळ्याचे नियोजन अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती आयोजकांनी दिली.

यंदाचा पालखी सोहळा शनिवार, दि. २५ जुलै रोजी सकाळी ८ वाजता महादेव घाट, पांढरकवडा येथून प्रारंभ होणार असून पायी वारी करत पालखीचे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, केळापूर येथे आगमन होईल. या पवित्र वारीत हजारो वारकरी, भाविक, महिला, युवक आणि नागरिक सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

🎯 तालुकाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद

या ऐतिहासिक सोहळ्याला केळापूर तालुका, पांढरकवडा शहर व परिसरातील वारकरी संप्रदाय, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ, विविध सामाजिक संस्था, व्यापारी संघटना, महिला बचत गट, युवक मंडळे तसेच सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून गावागावांतून मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी तयारी सुरू झाली आहे.

🎯 युवा टायगर फोर्सकडून व्यापक जनजागृती अभियान

या सोहळ्याच्या प्रचार आणि जनजागृतीची संपूर्ण जबाबदारी युवा टायगर फोर्स, पांढरकवडा यांनी स्वीकारली आहे. संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते शहरासह ग्रामीण भागात बॅनर, पोस्टर, पत्रके, घरोघरी निमंत्रण, सोशल मीडियावरील प्रचार आणि प्रत्यक्ष जनसंपर्क अभियान राबवत आहेत. या व्यापक मोहिमेमुळे अल्पावधीतच संपूर्ण केळापूर तालुक्यात पालखी सोहळ्याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली असून नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

🎯 “हा केवळ धार्मिक नव्हे, सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा सोहळा” — अंकित नैताम

युवा टायगर फोर्सचे संयोजक अंकित नैताम म्हणाले, “पायी वारी पालखी सोहळा हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून समाजात सेवा, समता, संस्कृती, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा लोकसहभागाचा उपक्रम आहे. या ऐतिहासिक सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी युवा टायगर फोर्सची संपूर्ण यंत्रणा कार्यरत असून प्रत्येक गावात, प्रत्येक घरापर्यंत आणि प्रत्येक वारकरी भाविकांपर्यंत या सोहळ्याची माहिती पोहोचविण्याचे अभियान सुरू आहे. सर्व नागरिक, वारकरी, सामाजिक संस्था, व्यापारी संघटना तसेच सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन हा सोहळा यशस्वी करावा.”

🎯 शिस्तबद्ध व आदर्श आयोजनावर भर

नियोजन समितीचे प्रमुख मदन जिद्देवार यांनी सर्व समित्यांनी परस्पर समन्वय राखून हा सोहळा शिस्तबद्ध, भव्य आणि आदर्श पद्धतीने पार पाडण्याचे आवाहन केले. प्रत्येक समितीने आपापल्या जबाबदाऱ्या वेळेत पूर्ण करून भाविकांना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, याची विशेष काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

🎯 धार्मिकतेसोबत पर्यावरण आणि सामाजिक संदेश

यंदाच्या पालखी सोहळ्यात धार्मिक परंपरेबरोबरच पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, सामाजिक ऐक्य, सेवा आणि लोकसहभाग यांनाही विशेष महत्त्व देण्यात आले आहे. वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, वारकऱ्यांसाठी सेवा सुविधा आणि महाप्रसाद व्यवस्था यामुळे हा सोहळा सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम ठरणार आहे.

आयोजकांच्या मते, युवा टायगर फोर्सच्या पुढाकारामुळे, नियोजन समितीच्या प्रभावी नेतृत्वामुळे आणि नागरिकांच्या वाढत्या सहभागामुळे यंदाचा ऐतिहासिक पायी वारी पालखी सोहळा हा केळापूर तालुक्याच्या धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासातील सर्वात भव्य, शिस्तबद्ध, प्रेरणादायी आणि लोकसहभागाचा सोहळा ठरणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

पेपरफुटीविरोधात पांढरकवड्यात युवा टायगर फोर्सचा एल्गार; शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांसाठी एसडीओ कार्यालयावर भव्य मोर्चा

दोन बैल चोरीच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश; पांढरकवडा पोलिसांची मोठी कारवाई, 6 आरोपी जेरबंद – ₹10.05 लाखांचा मुद्देमाल जप्त

मोहदा येथे 97 .50 लाखांचा दरोडा; ‘राजेंद्र ज्वेलर्स फोडले, चार मुखवटाधारी चोरटे दुचाकीवरून पसार

पांढरकवड्यात पोलिसांची मोठी कारवाई : कत्तलीसाठी नेली जाणारी २७ जनावरे मुक्त; ₹२९.८० लाखांचा मुद्देमाल जप्त, चार आरोपींवर गुन्हे

सहा.पोलिस अधिक्षक रॉबिन बन्सल यांच्या पथकाची मोठी कारवाई; कत्तलीसाठी हैदराबादकडे नेली जात असलेली २० गोवंश जनावरे व ५ पिकअप वाहने जप्त, ७ आरोपींवर गुन्हे दाखल

पांढरकवडा पोलिसांकडून चोरीस गेलेली मोटारसायकल हस्तगत; आरोपीला कोरपना जि.चंद्रपूरातून अटक

Leave a Comment