ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

अंतिम देयक व पूर्णत्व प्रमाणपत्रासाठी 10 हजारांची लाच घेताना जिल्हा परिषदेचा शाखा अभियंता एसीबीच्या जाळ्यात

On: July 15, 2026 3:03 PM
Follow Us:
---Advertisement---

✍️यवतमाळ | अशफाक खान

यवतमाळ जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग क्रमांक 1 मधील शाखा अभियंता मधुसूदन ताजणे वय 56 वर्ष यांना अंतिम देयक मंजूर करून देण्यासाठी आणि कामाचे पूर्णत्व प्रमाणपत्र (सीसी) देण्याच्या मोबदल्यात 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) यवतमाळच्या पथकाने मंगळवारी (15जुलै 2026) रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे जिल्हा परिषद वर्तुळात एकच खळबळ उडाली असून संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे शासनाच्या जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग तसेच इतर शासकीय विभागांमध्ये ठेकेदारीची कामे करतात. त्यांना ऑनलाइन निविदा प्रक्रियेद्वारे जिल्हा परिषद प्रशासकीय इमारत परिसरातील पार्किंग शेडचे बांधकाम तसेच पार्किंग व्यवस्था उभारणीची दोन कामे मिळाली होती.

ही दोन्ही कामे पूर्ण झाल्यानंतर संबंधित कामांचे अंतिम देयक मंजूर होण्यासाठी, मोजमाप पुस्तिका (एम.बी.) वर सही करण्यासाठी आणि पूर्णत्व प्रमाणपत्र (Completion Certificate – CC) देण्यासाठी शाखा अभियंता मधुसूदन ताजणे यांनी तक्रारदाराकडे 25 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला.

तक्रारदाराने ही बाब लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, यवतमाळ यांच्या निदर्शनास आणून देत अधिकृत तक्रार दाखल केली. त्यानंतर एसीबीच्या पथकाने लाचेच्या मागणीची पडताळणी केली असता, आरोपी अधिकाऱ्याने तडजोडीअंती 10 हजार रुपये स्वीकारण्यास तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले.

यानंतर एसीबीने नियोजनबद्ध सापळा रचला. 15 जुलै 2026 रोजी जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग क्रमांक 1 च्या कार्यालयात तक्रारदाराकडून 10 हजार रुपयांची लाच स्वतः स्वीकारताना शाखा अभियंता मधुसूदन ताजणे यांना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

🎯 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक सचिनेंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपअधीक्षक अभय आष्टेकर यांच्या पर्यवेक्षणात पार पडली. कारवाईत पोलीस निरीक्षक मनोज ओरके, पोलीस निरीक्षक अर्जुन घनवट, पोलीस हवालदार अतुल मते, अब्दुल वसीम तसेच पोलीस शिपाई आकाश सहारे यांनी सहभाग घेतला.

🎯 नागरिकांना एसीबीचे आवाहन

दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने अथवा त्यांच्या वतीने कोणत्याही व्यक्तीने कायदेशीर शासकीय शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, यवतमाळ (दगडी इमारत, टांगा चौक) येथे संपर्क साधावा. प्राप्त तक्रारीवर तातडीने कारवाई करण्यात येईल तसेच तक्रारदारांचे संबंधित शासकीय विभागात अडकलेले वैध काम पूर्ण करून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल.

या कारवाईमुळे शासकीय कार्यालयांमधील भ्रष्टाचाराविरोधात एसीबीने पुन्हा एकदा कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले असून, लाचखोरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना कायद्याचा धाक असल्याचा ठोस संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

ज्या नात्यावर गुन्हा दाखल झाला, त्याच नात्याचा विवाहात झाला शेवट

लाचखोर वनपालासह दोघे ACB च्या जाळ्यात; ४ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

रावेर जि.जळगांव ऐतिहासिक दोषसिद्धी बद्दल, यवतमाळचे पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांचा पोलिस महासंचालक,मुंबई यांच्या हस्ते गौरव; चार अल्पवयीनांच्या सामूहिक हत्येप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा प्रकरण

यवतमाळच्या महा वॉकथॉनमध्ये गजानन गंड्रतवार यांचा गौरव; चौथा क्रमांक पटकावत मिळविले ३ हजारांचे पारितोषिक

तीन महिन्यांत एसीबीच्या सलग पाच धडक कारवाया; यवतमाळ जिल्ह्यात लाचखोरांमध्ये खळबळ

₹15 हजारांची लाच मागितली; तडजोडीनंतर ₹10 हजार स्वीकारताना आर्णीतील पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात

Leave a Comment