ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

यवतमाळ हादरले! अशोकनगर-फुकटनगरमध्ये २५ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची विशेष मोहीम

On: August 4, 2026 5:58 PM
Follow Us:
---Advertisement---

✍️यवतमाळ :  अशफाक खान


शहरातील अशोकनगर-फुकटनगर परिसर मंगळवारी (४ ऑगस्ट) रात्री रक्तरंजित हत्याकांडाने हादरला. रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास २५ वर्षीय तरुणाची अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपीचा शोध घेण्यासाठी यवतमाळ शहर पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे.

मृत तरुणाची ओळख इन्नू उर्फ ईनायत अली इरफान अली (वय २५, रा. अशोकनगर-फुकटनगर, यवतमाळ) अशी झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, अज्ञात आरोपीने त्यांच्यावर धारदार शस्त्राने अचानक प्राणघातक हल्ला केला. हल्ला इतका भीषण होता की, इन्नू यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच यवतमाळ शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार निलेश सुरडकर यांच्यासह डीबी पथक, फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी परिसराचा पंचनामा करून घटनास्थळावरील महत्त्वाचे पुरावे संकलित केले असून, हत्येच्या तपासाला वेग दिला आहे.

हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी वैयक्तिक वाद, जुने वैमनस्य किंवा इतर कोणतेही कारण आहे का, याचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजची बारकाईने छाननी केली जात आहे. तसेच प्रत्यक्षदर्शींची चौकशी आणि तांत्रिक माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेण्यात येत आहे.

🎯 पोलिसांची तपासाची दिशा

– परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची सखोल तपासणी

– प्रत्यक्षदर्शी व स्थानिक नागरिकांची चौकशी

– तांत्रिक माहिती व कॉल डिटेल्सच्या आधारे संशयितांचा शोध

– आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यासाठी विशेष शोधमोहीम

या निर्घृण हत्येमुळे अशोकनगर-फुकटनगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपीला तातडीने अटक करून गुन्ह्याचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान यवतमाळ शहर पोलिसांसमोर आहे. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करत तपासात सहकार्य करण्याचेही आवाहन केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

रावेर जि.जळगांव ऐतिहासिक दोषसिद्धी बद्दल, यवतमाळचे पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांचा पोलिस महासंचालक,मुंबई यांच्या हस्ते गौरव; चार अल्पवयीनांच्या सामूहिक हत्येप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा प्रकरण

यवतमाळच्या महा वॉकथॉनमध्ये गजानन गंड्रतवार यांचा गौरव; चौथा क्रमांक पटकावत मिळविले ३ हजारांचे पारितोषिक

महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी वणीहून विजय नगराळे मित्र परिवार रवाना

वणीकरांसाठी चविष्ट मेजवानी; ‘रीध फूड प्लाझा’चा दिमाखात शुभारंभ

तीन महिन्यांत एसीबीच्या सलग पाच धडक कारवाया; यवतमाळ जिल्ह्यात लाचखोरांमध्ये खळबळ

₹15 हजारांची लाच मागितली; तडजोडीनंतर ₹10 हजार स्वीकारताना आर्णीतील पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात

Leave a Comment