ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

जंतर-मंतरवरील कथित लाठीचार्जाच्या निषेधार्थ वणीत काँग्रेसचे आंदोलन; निष्पक्ष चौकशी, दोषींवर कारवाईची मागणी

On: July 25, 2026 1:33 AM
Follow Us:
---Advertisement---

✍️वणी | प्रतिनिधी

दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततामय आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जाच्या निषेधार्थ वणी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या लोकशाही हक्कांचे संरक्षण, निष्पक्ष चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव यांनी सहभाग घेत विद्यार्थ्यांच्या लोकशाही हक्कांच्या समर्थनार्थ भूमिका मांडली. शांततामय आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर झाल्याचा आरोप गंभीर असून, या प्रकरणाची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर तसेच शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

🎯 निवेदनातील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:

– विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जाची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी.

– दोषींवर कठोर कायदेशीर आणि शिस्तभंगाची कारवाई.

– जखमी विद्यार्थ्यांना तातडीने वैद्यकीय उपचार व योग्य नुकसानभरपाई.

– भविष्यात शांततामय आंदोलनांवर बळाचा वापर होणार नाही, याबाबत शासनाची स्पष्ट हमी.

यावेळी उपस्थित नेत्यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही. लोकशाही, संविधान आणि न्यायाच्या रक्षणासाठी काँग्रेसचा संघर्ष कायम राहील.”

या प्रसंगी देविदासजी काळे, टीकारामजी कोंगरे, विकेश पानघाटे, जय आबड, तेजराज बोढे, पुरुषोत्तम आवरी, वंदना आवरी, शामाताई तोटावार, वंदना धगडी, शालिनी रासेकर, जयसिंग गोहकार, राजू अंकतवार, शंकर वऱ्हाटे, भाऊराव कावडे, मोरेश्वर पावडे, अनिल भोयर, रुपेश ठाकरे, प्रमोद लोणारे, पलाश बोढे, मनीष खाडे, रवींद्र कांबळे तसेच काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment