✍️पांढरकवडा | अशफाक खान
पांढरकवडा नगर परिषद निवडणुकीतील दणदणीत विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज सोमवार, दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी शहरात भव्य विजयी मिरवणूक (विजय रॅली) आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीला लोकनेते अण्णासाहेब पारवेकर तसेच केळापूर–आर्णी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजूभाऊ तोडसाम यांचे नेतृत्व लाभणार आहे.
या ऐतिहासिक विजय रॅलीत भाजपचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आतिष उर्फ सोनू भैया बोरेले यांच्यासह सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होणार असून, संपूर्ण शहरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.
🎯 रॅलीचा प्रारंभ, वेळ व ठिकाण
🔺वेळ: दुपारी 1.00 वाजता
🔺प्रारंभस्थळ: लोकमंगल कार्यालय, आखाडा वार्ड, पांढरकवडा
🔺विजय रॅलीचा मार्ग (Route Map)
लोकमंगल कार्यालय → बिरसा मुंडा चौक → शिबला ऑटो पॉईंट → संतोषी माता मंदिर → शिवाजी महाराज पुतळा → आठवडी बाजार → शामलालाजी जैस्वाल यांच्या घरासमोरून → श्रीराम मंदिर → तहसील चौक → मित्र क्रीडा मंडळ
🎯 समारोपीय सभा
रॅलीनंतर मित्र क्रीडा मंडळ येथे समारोपीय सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत लोकनेते, आमदार, नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक मार्गदर्शन करणार असून, जनतेचे आभार व्यक्त करत पुढील विकासात्मक वाटचालीचा संकल्प मांडला जाणार आहे.
🎯 विजयाचा उत्सव; जनतेचा सहभाग अपेक्षित
नगर परिषद निवडणुकीत भाजपला मिळालेल्या प्रचंड जनसमर्थनाचे हे प्रतीकात्मक उत्सव रूप आहे. विकास, पारदर्शक प्रशासन आणि शहराच्या सर्वांगीण प्रगतीच्या वचनबद्धतेसह ही रॅली काढण्यात येत असून, सकल हिंदू समाज, भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते, तसेच सर्व सन्माननीय मतदार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
🎯 महत्त्वाच्या सूचना (Updates)
रॅलीदरम्यान वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल संभवतात.
नागरिकांनी संयम राखून प्रशासनाला सहकार्य करावे.
शिस्तबद्ध व शांततेत रॅली पार पाडण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टी,पांढरकवडा शहर व तालुका आयोजकांकडून करण्यात आले आहे.











